आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचा आढावा‎:बुलडाणा येथे 26 व 27 जानेवारीला‎ होणार वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन‎

बुलडाणा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे‎ यंदाचे राज्य अधिवेशन २६ व २७ जानेवारी‎ रोजी बुलडाणा येथे होत आहे.या‎ अधिवेशनास राज्यातील सर्व जिल्ह्यातून‎ जवळपास दोन हजार वृत्तपत्र विक्रेते, एजंट व‎ वितरक उपस्थित राहणार असल्याचा दावा‎ महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे‎ कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे.‎ अधिवेशनाचा आढावा घेतल्यानंतर‎ पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.‎ यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता‎ संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी,‎ कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, राज्य संघटना‎ संघटक प्रकाश उन्हाळे, कार्यकारिणी सदस्य‎ चंद्रकांत घाटोळ नांदेड, राजेंद्र हलवाई‎ हिंगोली उपस्थित होते.‎ ‎

२७ जानेवारी रोजी सकाळी वृत्तपत्र दिंडी‎ काढण्यात येईल. त्यानंतर अकरा वाजता‎ अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम होईल हे सर्व‎ कार्यक्रम बुलडाणा शहर व शहरातील राधा‎ गोविंद सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहेत या‎ अधिवेशनाचे संयोजन बुलडाणा जिल्हा‎ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात‎ येत आहे. राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार‎ यांनी अधिवेशन निमित्ताने आज पर्यंत‎ केलेल्या तयारीची माहीती दिली बुलडाणा‎ जिल्ह्याचे पदाधिकारी प्रकाश उन्हाळे शेगाव,‎ ज्ञानेश्वर इंगळे मेहकर, उमेश देशमुख, राहुल‎ डिडोळकर, माधव देशमुख, संतोष गाडेकर,‎ वैभव वाघमारे, अतुल देशमुख ,यादव हाके,‎ श्रीकांत चौधरी ,रवींद्र चिंचोळकर आदी‎ पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...