आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बाबाविरुद्ध गुन्हा

महागाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळवागद येथे एका भोंदूबाबाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला होता. अखेर भोंदूबाबाचा तरुणांनी पर्दाफाश केला. तक्रारीवरून पोलिसांनी बाबाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे माहित होताच बाबा पसार झाला. महागाव तालुक्यातील माळवागद येथे फासेपारधी समाजातील काही कुटुंबांनी गावगुंडाच्या जाचाला कंटाळून गाव सोडून जवळ असलेल्या जंगलामध्ये कुटुंबासह पलायन केले हाेते. गावातील नागरिकांशी चांगले संबंध असताना या बाबाने शासकीय योजनांची लालूच दाखवल्यामुळे पारधी समाजातील कुटुंबांनी वन विभागाच्या जंगलामध्ये आश्रय घेतला होता.

जे समाजबांधव त्या बेड्यावर जात नाही अशा कुटुंबांना धमक्या देत असल्याची तक्रार बालकृष्ण परशुराम पवार (४३) यांनी तथाकथित बाबा वैभवविलास हरिभाऊ बुटले (रा. देऊरवाडी) यांच्याविरुद्ध दिली होती. त्यावरून बुटलेविरुद्ध ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी माळवागद येथे फासेपारधी बांधव व गावकऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती काय आहे, हे जाऊन घेतले. जंगलात वास्तव्यास गेलेल्या पारधी बांधवाना संरक्षणाची हमी दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, विलास चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जंगलात गेलेली कुटुंबे पुन्हा परतले.

बातम्या आणखी आहेत...