आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरापासून जवळच असलेल्या कवडीपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बजरंग नगरमधील बंद घरात शनिवार, दि. ४ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किट होवून आग लागली. त्यामुळे घरात ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घर पूर्णत: जळून खाक झाले. या आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने जीवित हानी टळली. अप्पाराव उबाळे असे नुकसान झालेल्या भाडेकरूचे नाव आहे. ते विजय भिसे यांच्या घरात भाड्याने राहत होते. कवडीपूर ग्रामपंचायत हद्दीतील बजरंग नगर येथे प्रकाश भिसे यांचे घर आहे. त्यांनी अप्पाराव उबाळे यांना भाड्याने घर दिले होते. अशात सकाळी कामानिमित्त ते घरा बाहेर पडले होते. शनिवार, दि. ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घर बंद करून गेले होते. बंद घरात शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे घराला भीषण आग लागली. आगीत घरात ठेवलेला सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यामुळे अख्खं घर जळून खाक झाले आहे. घरामधील टीव्ही, कपाट, अंगणात ठेवलेली दुचाकी, सोने, चांदीसह बचत गटाचे ६५ हजार रुपये, आणि सात हजार रुपये पगाराचे, अशी रोख रक्कम सुद्धा घरात होती. ती रोख देखील जळून खाक झाली आहे. सोबतच संसारोपयोगी साहित्याची देखील राखरांगोळी झाली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. आग लागल्याची माहिती कळतात तलाठ्याने तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आगीत दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला असून, कुटुंबाला तात्काळ मदत करावी, अशी मागणी देखील केल्या जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.