आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेचे आयोजन:जनुना येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी; जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा उपक्रम

उमरखेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जनुना येथे जिल्हा कृषी अधिकारी यांनी रात्री मुक्कामी राहून शेतकऱ्यांशी हितगुज करून माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी व त्याची कारणमीमांसा जाणून घेण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय जनुना येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध विभागाच्या प्रश्नांचे निरसन केले. तसेच फळबाग लागवड, सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, पिक विमा, शेतकरी अपघात विमा योजना, आदी योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी सहाय्यक सोमनाथ जाधव यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचे सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी शेतकऱ्यांची दिनचर्या जाणून घेण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता शेत शिवारांची फेरी केली.

यावेळी सदाशिव संभराव ठाकरे व संभा रेखा राठोड यांच्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. सुभाष मंचा राठोड यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पीक नुकसान बाबत पूर्वसूचना देण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले तसेच इतरांनी सुद्धा या पद्धतीने अवलंब करण्यास आव्हान केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या हळद प्रक्रिया उद्योगाची पाहणी करण्यात आले. त्यानंतर मग्रारोह अंतर्गत नव्याने लागवड केल्या संत्रा मोसंबी या फळबाग लागवडीची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय जनुना येथे आयोजित केलेल्या या सभेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, सरपंच सुभाष राठोड, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर, कृषी पर्यवेक्षक रामकृष्ण शिंदे, कृषी सहाय्यक प्रकाश इंगळे, संदीप कावळे, सतीष बडेराव तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी संभाजी हनुमंता कवाने यांचे सह मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...