आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मारेकरी ताब्यात:क्षुल्लक कारणावरून भंगार विकणाऱ्या दिव्यांग व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या; गंगानगर नाल्याजवळील घटना

पुसद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून भंगार वेचून विकणाऱ्या एका ४० वर्षीय दिव्यांग व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील कवडीपूर ग्राम पंचायत परिसरात असलेल्या गंगानगर नाल्या जवळ दि. ८ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. अजय शालिकराम येवले वय ४० वर्ष रा. ओम नगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मारेकरी गजानन काळे व शेख समीर शेख सलीम दोघेही रा. श्रीरामपूर यांना वसंत नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील ओम नगर येथील अजय येवले याने मित्र गजानन काळे याला शिविगाळ केली होती. त्याचा राग मनात ठेवून गुरुवारी मध्यरात्रीनंतर गजानन आणि त्याचा मित्र शेख समीर शेख सलीम या दोघांनी संगनमत करून गंगानगर नाल्या जवळ डोक्यात दगड घालून अजय याची हत्या केली. यात गंभीर जखमी होवून अजय याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती अजय याच्या भावाला कळताच त्याने घटनास्थळ गाठले. यावेळी अजयचा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला होता. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात पाठविला.

नशेत खून केल्याची चर्चा
ओम नगर येथे राहणाऱ्या अजय याला दि. ७ सप्टेंबरला मटका लागल्याने त्याच्याकडे पैसे आले होते. मटक्यात आलेल्या पैशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या मित्राला दारू पाजतो असे म्हणत तिघांनीही दारू पिली. त्यानंतर दारूच्या नशेमध्ये तिघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातच मारेकऱ्यांनी अजयची दगडाने ठेचून हत्या केली. अशी प्राथमिक माहिती चर्चेतून समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...