आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:निरोप समारंभ म्हणजे उत्कृष्ट कार्याची पावती; पार्डी येथील शाळेमध्ये गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वहाणे यांचे प्रतिपादन

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील सर्व शिक्षक, गावातील मान्यवर, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत गावात एवढा भव्य कार्यक्रम होत असेल तर निश्चितच त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, प्रामाणिक कार्याची माहिती पावतीच आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वहाणे यांनी केले.पार्डी येथील शाळेत देविदास कोरवते यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला शिक्षण विस्तार अधिकारी संतोष मेश्राम, विजया वैद्य, साखरा केंद्रप्रमुख बनसोड, पार्डीचे केंद्रप्रमुख सुधाकर वांढरे तसेच पार्डी येथील ग्रामपंचायत सरपंच अलका देवतळेंसह पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पार्डी शाळेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक ज्योती घोडे यांचा निरोप समारंभ केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी केंद्रातील बहुतांश शिक्षकांनी आपल्या मनोगतातून घोडे यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. घोडे यांचा सहपरिवार सत्कार करून त्यांना भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह प्रदान केले. शाल, श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देऊन घोडे यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या सत्रात मेश्राम यांचा उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा सर्व शिक्षकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष खडसे, तर आभार गजेश राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप राठोड, अमीत राठोड, गौरखेडे, ढवळे यांच्यासह पार्डी केंद्रातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...