आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बेपत्ता:नाल्याच्या पुरात शेतकरी दाम्पत्याची बैलगाडी गेली वाहून, महिला बेपत्ता

महागाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस आल्यामुळे शेतातून घराकडे येणाऱ्या शेतकरी दाम्पत्याची बैलगाडी नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने महिला बेपत्ता झाली असुन बैलगाडीतील दोन नागरिकांचा जीव वाचला तर दोन्ही बैल मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना महागाव तालुक्यातील काळी (टेंभी) गुरूवार, दि. ४ ऑगस्टला दुपारच्या सुमारास घडली.

महागाव तालुक्यातील काळी (टेंभी) शिवारात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आपली कामे सोडून घराकडे निघण्याची घाई केली होती. यावेळी काळी (टेंभी) येथील मारोती पवार वय ६० वर्ष, त्यांची पत्नी कमलाबाई पवार वय ५५ वर्ष व त्यांचा शेतमजुर मरगू जाधव हे बैलगाडी घेवुन घराकडे निघाले होते. गावकरी व प्रशासनाच्या वतीने वाहुन गेलेल्या महिलेचे शोध कार्य चालुच होते.

ओसरलेल्या पावसाचे पुन्हा आगमन उमरखेड, महागाव भागाला फटका उमरखेड गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांनी कामांना सुरूवात केली होती. या काळात चांगली ऊन तापल्याने उष्णतेतही वाढ झाली होती. दरम्यान जिल्ह्या पावसाचा उमरखेड, महागांव तालुक्यातील बऱ्याच भागांना फटका बसला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळी पाऊस सुरु झाला. काही वेळातच मुसळधार पाऊस होवून सगळा उमरखेड तालुका जलमय होवुन तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले. उमरखेड-पुसद मार्गावरील दहागावच्या पूलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे हा सगळा रस्ता बंद होवून लहान व मोठे वाहन, एसटी बस अशी सगळी वाहने जागच्या जागीच थांबली.

उमरखेड-पुसद दहागावच्या पूलावरून पूरांचे पाणी वाहत असल्यामुळे कोणालाही पाणी कमी झाल्याशिवाय जाता येत नव्हते. उमरखेड-पुसद हा राज्य मार्ग आहे. या रस्त्यावर वाहन धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ट्रॉफीक पोलीस व स्वयंसेवक यांनी वाहन धारकांना सहकार्य केले. पूरांच्या पाण्यामधून कोणत्या वाहन चालकाला वाहन टाकू दिले नाही. मागील वर्षी लोणाडी पूलावरून एसटी बस वाहून गेली होती. त्यात चार जनांचा बळी गेला होता. तशी घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात उमरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सातत्याने झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...