आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने घेतले विष:अतिवृष्टीने शेती लयास गेल्याने निगंनुर (हिरामनगर) च्या शेतकऱ्याने घेतले विष

निगंनुर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील निगंनुर येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने सोमवारी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. यंदाच्या झालेल्या अतिवृष्टीने शेती लयास गेल्याने सदर शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. चंपत नारायण जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उमरखेड तालुक्यातील निगंनुर (हिरामनगर) येथील चंपत जंगले याच्याकडे १-४२ एकर शेती आहे. यंदाच्या अतिवृष्टीने तब्बल १.४२ एकर शेती खरडून गेली. उर्वरित शेतातील पिके पाण्याखाली आली. मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई, पत्नी आणि ३ मुली १ मुलगा असा परिवार आहे.

शिवानी धाबे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील शिवणी (धोबे) येथे एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हरिदास सूर्यभान टोणपे वय ४८ वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दि. ३० ऑगस्टला सकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. पुरामध्ये हरिदास यांचे शेत पुराच्या पाण्यात खरडून गेले होते. त्यामुळे ते निराश होते अशी माहिती आहे. यापूर्वी तालुक्यात म्हैसदोडका, नरसाळा आणि दांडगाव नंतर आज पुन्हा ही आत्महत्येमुळे तालुका हादरून गेला आहे.

मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीची आत्महत्या पुसद शहरापासून जवळच असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३० ऑगस्टला सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केल्याची माहिती मृताच्या आई व भावाने शहर पोलिसांना दिली असून पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. भगवान उद्धव पारध वय ३५ वर्ष रा. काकडदाती असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भगवान हा गेल्या काही महिन्यापासून मानसिक आजाराने त्रस्त झाला होता. त्याच्यावर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...