आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात हळहळ‎ व्यक्त:घराची भिंत अंगावर पडल्याने चार‎ वर्षांच्या चिमुकलीचा गुदमरून मृत्यू‎

पुसद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घराची मातीची भिंत अंगावर‎ पडल्याने त्याखाली दबलेल्या ४‎ वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा‎ गुदमरून करुण अंत झाला.‎ ही हृदयद्रावक घटना शहरातील‎ विटावा वार्ड परिसरात बुधवार दि. १‎ मार्च रोजी रात्री उघडकीस‎ आली.चिमुकल्या चार वर्षीय‎ मुलीचा असा मृत्यू झाल्याने‎ परिसरासह संपुर्ण शहरात हळहळ‎ व्यक्त केल्या जात आहे.‎ प्रतिमा संतोष बुरकुले वय ४ वर्षे ६‎ महिने असे मृत्यू झालेल्या‎ चिमुकलीचे नाव आहे. ती तीचे‎ वडील संतोष बुरकुले हे त्यांची पत्नी‎ माला व दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के‎ दिव्यांग असलेल्या आईसोबत‎ येथील नाग मंदिराच्या पाठीमागे‎ राहत होती.

तीचे आई-वडील ‎शेतमजुरी‎ करून‎ उदरनिर्वाह‎ करतात.‎घटनेच्या‎ दिवशी नेहमी‎ प्रमाणे हे दांपत्य शेतमजुरी‎ करण्यासाठी जातांना दोन्ही‎ डोळ्यांनी दिव्यांग असलेली‎ वयोवृद्ध आईजवळ त्यांच्या ४ वर्षीय‎ प्रतिमाला सांभाळण्यासाठी सोडुन‎ गेले होते.प्रतिमा प्रतीमा दुपारी ४‎ वाजताच्या दरम्यान घरात एकटीच‎ खेळत होती.‎ यावेळी त्यांच्याच घराची मातीची‎ भिंत अचानक चिमुकलीच्या‎ अंगावर कोसळली.

त्यात ती‎ चिमुकली भिंती खाली अडकून‎ राहिली. बराच वेळ झाला तरी‎ शेजारी राहणाऱ्या व दोन्ही‎ डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या‎ वयोवृद्ध महिलेला भिंत पडल्याची‎ व चिमुकली भिंती खाली अडकून‎ पडल्याचे कळालेच नाही.‎

तब्बल साडेतीन तासाच्या नंतर‎ शोध घेताना रात्री ७.३० वाजताच्या‎ दरम्यान ती भिंती खाली दबून‎ आढळून आली. त्यानंतर तीला‎ तात्काळ येथील रुग्णालयात‎ उपचारांकरिता नेण्यात आले.‎ यावेळी उपस्थित डॉक्टरांनी तिला‎ मृत घोषित केले. मातीची भिंत‎ कोसळल्याने घराचे देखील मोठे‎ नुकसान झाले आहे. दरम्यान‎ तहसील प्रशासनाने घटनास्थळी‎ भेट देवुन पंचनामा केला. एका‎ चिमुकलीचा असा अचानक जीव‎ गमवावा लागल्याने संपुर्ण शहरात‎ हळहळ व्यक्त केल्या जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...