आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने लावला गळफास

आर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवार, दि. ३ डिसेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. काजल जयस्वाल वय १७ वर्ष रा. आर्णी असे मृत मुलीचे नाव आहे.

आर्णी शहरातील खोकला माता मंदिराजवळ राहणारे प्रदीप जयस्वाल यांची मुलगी काजल ही इयत्ता बारावी मध्ये शिकत होती. शनिवारी काजल हिने आपल्या राहत्या घरी छताच्या नाटीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आर्णी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय शिवराज पवार, शेख नफिस, ऋषी करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...