आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ गावांत ‘एक गाव एक गणपती:उमरखेड तालुक्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून शहराच्या प्रत्येक भागात पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात आहेत. यावर्षी शहरात ६८ तर ग्रामीणमध्ये १०२ गणेश मंडळांची स्थापना झाली असून २६ गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला आहे.

या गणेश उत्सवासाठी उमरखेड ठाण्याअंतर्गत १६ पोलिस अधिकारी २३६ पोलिस कर्मचारी ६० अंमलदार, होमगार्ड तसेच १ सीआरपीएफची जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. ग्रामीणमध्ये दिंडाळा, देवसरी, वरुडबीबी, पिरंजी, बोरी, परजना, बारा, लोहरा, दत्तनगर, खरुस (बु) चालगणी, तिवडी, लिंबगव्हाण, संगम चिंचोली, कारखेड, कोपरा, बिटरगाव, दिघडी, उंचवडद, मरसुळ, रामनगर, अमानपूर यासह २६ गावात ‘एक गाव एक गणपती ‘ संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. गणेश उत्सवाची सुरुवात झाली. त्या अगोदरपासून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून येत्या ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनापर्यंत हा बंदोबस्त राहणार असून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक खेडकर आदी बंदोबस्तासह शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवून आहेत.

बातम्या आणखी आहेत...