आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:तेल्हारा येथे काढण्यात आली भव्य मोटार‎ सायकल रॅली; ठिकठिकाणी स्वागत‎

दानापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या‎ जयंतीनिमित्त तेल्हारा नगरीमध्ये भव्य मोटर‎ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.‎ तेल्हारा शहरातील शेगाव रोडवरील‎ पुरुषोत्तम इंगळे यांचे प्रतिष्ठानपासून महात्मा‎ फुले यांच्या जयघोषात संपूर्ण संपूर्ण शहरभर‎ भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, तथागत‎ गौतम बुद्ध तर शहरातील टॉवर चौकामध्ये‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे‎ मान्यवरांकडून पूजन व पुष्पहार अर्पण करून‎ करून अभिवादन करण्यात आले.‎ मिरवणुकीमध्ये रथातील महात्मा फुले यांची‎ मूर्ती व शिस्तबद्ध अशा आकर्षक वेशभूषेतील‎ पिवळ्या फेट्यातील महिला मिरवणुकीची‎ शोभा वाढवत होत्या. सांगता अनंतराव‎ भागवत मंगल कार्यालय येथे करण्यात आली.‎

या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात‎ आले. या सभेच्या व्यासपीठावर प्रमुख‎ मान्यवर म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश‎ गणगणे, जि. प. अकोलाच्या विद्यमान‎ अध्यक्षा संगीता नंदकिशोर अढाऊ, जि. प.‎ सदस्य संजय अढाऊ, पं.स. सदस्य संजयजी‎ हिवराळे, अरविंदजी उमाळे, गोकुळा महेंद्र‎ भोपळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध‎ विधिज्ञ संतोष रहाटे, काँग्रेस कमिटीचे‎ श्यामशील भोपळे, कृषी उत्पन्न बाजार‎ समितीचे संचालक रमेश दारोकार, ग्रा.पं.‎ बेलखेडचे उपसरपंच नंदकिशोर निमकर्डे,‎ पाथर्डीचे सरपंच प्रकाश उगले, मनब्दा येथील‎ सरपंच गोपाल राऊत, खंडाळाच्या सरपंच‎ स्वाती गजाननराव वानखडे, उद्यान पंडित‎ गजानन वानखडे, भाजपचे तालुकाध्यक्ष‎ गजानन उंबरकार, भाजपचे युवा नेता लखन‎ राजनकर, राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीकांत‎ तायडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप‎ बाळकृष्ण खारोडे, केंद्रप्रमुख प्रकाश राऊत,‎ प्राचार्य अरविंदजी गिऱ्हे, दुर्गा विठ्ठल इंगळे,‎ नंदकिशोर अढाऊ, प्रकाश वानखडे, प्रसिद्ध‎ व्याख्याते भीमराव परघरमोल, अ. भा. माळी‎ महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भड,‎ श्याम जिंदे तर तालुकाध्यक्ष हरिदास भोपळे,‎ दानापूर येथील ग्रा. पं. सदस्य रवींद्र तायडे‎ आदी मान्यवर उपस्थित होते.‎