आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मला भावलेली माणसं’पुस्तकाचे प्रकाशन:अनुकरणीय व्यक्तींच्या चारित्र्यातील वेचे नव्या पिढीला मार्गदर्शक: कवठेकर

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला भावलेली माणसांच्या रूपाने समाजाने ज्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करायला हवे. अश्या व्यक्तींच्या चरित्रातील वेचे अगदी साध्या आणि सरळ भाषेत लिहून लेखक सदानंद देशपांडे यांनी नव्या पिढीला मार्गदर्शक असे सर्वांगसुंदर पुस्तक मराठी साहित्याला मिळवून दिले आहे, असे मत विवेक कवठेकर यांनी व्यक्त केले.

शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी, कीर्तनकार आणि लेखक सदानंद देशपांडे लिखित मला भावलेली माणसं या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शिशु विहार मंडळाच्या मायादेवी भालचंद्र सभागृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदाचार्य वैद्य अविनाश जोशी होते. ज्येष्ठ समीक्षक आणि संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत कार्यवाह विवेक कवठेकर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक आष्टीकर, पुस्तकाचे प्रकाशक सुलेखनकार, राजेंद्र बिदरकर व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक आष्टीकर म्हणाले, सोपं लिहणं ही फार कठीण गोष्ट आहे. साध्या सोप्या आणि संवादी शैलीमध्ये सदानंद देशपांडे यांनी या व्यक्तींचा परिचय करून दिला आहे. या माध्यमातून आपापल्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांना त्यांनी एक प्रकारे अजरामर केले आहे, अशा भावना आष्टीकरांनी व्यक्त केल्या.

सदानंद देशपांडे यांनी कोरोनाच्या लॉक डाऊनच्या कालखंडात या पुस्तकाला मूर्त रूप दिल्याचे सांगितले. ज्या व्यक्तींच्या बद्दल पुस्तकात लेखन केले आहे त्यांच्याबद्दल लिहण्याचे अनेक वर्षांपासून मनात होते. मात्र कोरोनाच्या कालखंडात ते प्रत्यक्षात कागदावर उतरवता आले. पुस्तक प्रकाशनाचं प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं ते या निमित्ताने पूर्ण करता आलं, असेही ते म्हणाले. राजेंद्र बिदरकर यांनी पुस्तक तयार होतानाची पार्श्वभूमी कथन केली. वैद्य अविनाश जोशी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात लेखक आणि लेखकाने वर्णन केलेल्या व्यक्तींशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाबद्दल भावपूर्ण असे भाष्य केले. चैतन्य देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रस्तावनेचे वाचन नूपूर देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जयंत चावरे यांनी केले. आभार संपदा देशपांडे यांनी मानले. देवव्रत देशपांडे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...