आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस शहरासह ग्रामीण भागात शनिवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका विद्युत तारेवर बसल्याने विद्युत पुरवठा काही ठिकाणी रात्रभर खंडित राहिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली.
अचानक झालेल्या सुसाट वादळी वाऱ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील मोठे झाडे कोसळल्याने अनेकांच्या घराचे, दुकानाचे मोठे नुकसान झाले. याच वाऱ्यामुळे शहरातील दिग्रस मानोरा मुख्य रस्त्यावरील ११ केव्ही विद्युत तारेवर रस्त्याच्या लगत असलेली झाडे पडल्याने विद्युत तारा पूर्णतः तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीने काही विद्युत ताराजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्या. परंतु, उर्वरित राहिलेल्या झाडांच्या फांद्या मान्सूनपूर्व तोडणे न झाल्याने त्या झाडांच्या मोठ्या फांद्या वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने विद्युत खांबावरील तार तुटून पडली. दिग्रस मानोरा रस्त्यावरील ११ केव्ही विद्युत तारा एक किलोमीटरपर्यंत तुटून पडल्याने तारा रस्त्यावर लोंबकळत होत्या. रात्रीपासून वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे दिग्रस केशवनगर, समता कॉलनीसह इतर ठिकाणीही विद्युत पुरवठा दुपारपर्यंत बंदच होता.
शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका वीज वितरण कंपनीला सोसण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीने तारेवर पडलेल्या फांद्या जेसीबीच्या साहाय्याने बाजूला सारणे सुरू केले आहे. या अस्ताव्यस्त प्रमाणात विद्युत तारा तुटल्याने रविवारी सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाही. मोठ्या प्रमाणात तारा तुटल्याने अधिकारी कर्मचारी कामे करीत आहे. अर्धा तास वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.