आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात;‘नाम’ ही आत्मविश्वास पेरणारी संस्था

वर्धा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाम ही माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ असून शेतकरी परिवारातील दुःखद प्रसंगात आधार देणारी आणि तुम्ही एकटे नाहीत, हा विश्वास पेरणारी संस्था आहे, असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे विदर्भ, खान्देश प्रमुख हरीश इथापे यांनी सानुग्रह राशी वाटप कार्यक्रमात केले.

स्थानिक मगन संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात नामद्वारे पहिल्या टप्प्यात वर्धा, सेलू व देवळी तालुक्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. विदर्भातील दोन हजार परिवारांना सुमारे ५ कोटी रुपयांची मदत महिनाभरात करण्यात येणार असून या रकमेतून घरगुती उद्योग, मुलामुलींचे शिक्षण यासाठी ही मदत उपयोगी ठरेल, असेही हरीश इथापे म्हणाले.

अनेक संस्था तात्पुरते काम करतात आणि अदृश्य होतात. मात्र, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेली ही चळवळ स्थापनेपासून आजतागायत सातत्याने काम करीत आहे. ज्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना अत्यंत निकड असते. अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात देण्याचे काम नामने केले आहे, असे उद्गार किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रवर्तक अविनाश काकडे यांनी काढले.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नितीन झाडे, नरेंद्र पहाडे, जिल्हा समन्वयक हरीश भगत, समन्वयक शुभम झाडे, आधार संघटनेचे विदर्भ विभाग अध्यक्ष जतीन रणनवरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही सानुग्रह राशी वाटप कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे यांनी केले, तर आभार मगन खादी विभाग संचालक मुकेश लुतडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...