आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लोणबेहळ येथील उड्डाण पुलावर ट्रकचा भीषण अपघात; वाहतूक विस्कळीत

आर्णी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - तुळजापूर महामार्गांवर लोणबेहळ येथील उड्डाणं पुलावर तांदुळाचा धान वाहतूक करणारा ट्रक व ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅकच्या पाठीमागून धडक देऊन ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना शुक्रवार, दि. १ एप्रिलला पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.महागाव तालुक्यातील खांबळवाडी येथील अनिल पवार यांचा एमएच-२६-एच-५५१५ हा उसाचा ट्रक मगरुळ येथील साखर कारखान्यात ऊस खाली करून परत उमरखेडकडे जात होता. अशात लोणबेहळ जवळील उड्डाणं पुलावर पाठीमागून येणारा एमएच-४०- बीजी-८२४२ हा तांदुळाच्या धानाने भरलेला ट्रॅक भरधावं वेगाने ऊस खाली करून येणाऱ्या ट्रॅकच्या पाठीमागील बाजूस जोरात धडकला. या धडकेत तो ट्रक थोड्या अंतरावर महामार्गांवरील उड्डाणं पुलाच्या मधोमध पलटी झाला. ट्रॅक पलटी झाल्याने धानाचे पोते रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. यामध्ये पलटी झालेल्या ट्रॅक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...