आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराला आग:कळंबमध्ये जामा मशिदीलगत घराला आग; वापरणीत नसलेल्या वस्तू व सोयाबीन, तुर असा ऐवज जळून खाक झाल्याने लाखो रुपये नुकसान झाले

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जामा मशिदच्या बाजूला असलेल्या अ. खालीद अ. गणी खतीब यांचे पुरातन बंडा असलेल्या घराला अचानक आग लागली. गुरूवार दि. १२ मे रोजी दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडलेल्या या घटनेत पहाता पहाता आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये घरात ठेऊन असलेले शेती उपयोगी साहीत्य, घरातील वापरणीत नसलेल्या वस्तू व सोयाबीन, तुर असा ऐवज जळून खाक झाल्याने लाखो रुपये नुकसान झाले.

प्राप्त माहिती नुसार कळंब तालुक्यात अ. खालील अ. गणी खतीब यांची वडिलोपार्जित शंभर एकर जमीन असुन शहरातील सदन शेतकरी आहेत. त्यांचे राहते घर सिमेंट काँक्रीट स्लॅबचे असुन त्याला लागूनच समोरच वडिलोपार्जित टिनपत्रे, मातीच्या भिंती, लाकडी मयालीचा पुरातन बंडा आहे. या बंड्या मध्ये शेती उपयोगी साहित्य, शेतातील निघालेले पिक, अरगडीतील (निरुपयोगी) सामान भरुन होते. १२ मे दुपारी १२ वाजताचे दरम्यान अचानक त्या जागी आग लागुन आगीचा भडका उडाला. ही बाब लक्षात येताच शहरातील नागरिक, युवा वर्ग यांनी धावत जावुन आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला.

त्यानंतर एक तासाने अग्निशमन दलाची गाडी आली व आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. घराच्या आजुबाजूच्या भागाकडून रस्ता असल्याने शेजाऱ्यांना आगीची झळ पोहोचली नाही. यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी, पोलीस निरीक्षक अजित राठोड गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनी भेट दिली. तर तलाठी निरंजन सातघरे यांनी पंचनामा केला. लाखो रुपयांचे खतीब परिवाराचे नुकसान झाल्याचे दिसुन आले.

बातम्या आणखी आहेत...