आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर पेटवले:जुन्या वादातून कारसह घर पेटवले

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून एका युवकाचे कारसह घर पेटवल्याने एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना शहरातील संकटमोचन परिसरातील माकडे शाळेसमोर गुरूवारी रात्री घडली. यात जवळपास २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी मयूर उर्फ चिनी पुसनाके (२५) रा. संकटमोचन, यवतमाळ याच्यासह दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संकटमोचन परिसरातील रहिवासी रघुनाथ नक्षणे हा मित्राच्या भावाचे लग्न असल्याने कुटुंबीयांसह धामणगाव येथे गेला होता. गुरूवारी रात्री मयूर उर्फ चिनी पुसनाके हा त्याच्यासह अन्य दोन साथीदारांसह रघुनाथ नक्षणे याच्या घराजवळ आला. त्यानंतर त्या तिघांनी कारवर दगडफेक करून काच फोडली, याबाबतची माहिती शेजारी असलेल्या आशिष फलटणकर याने फोनद्वारे नक्षणे याला दिली. दरम्यान नक्षणे याने तत्काळ यवतमाळ गाठून पाहणी केली.

त्यानंतर तक्रार देण्यासाठी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान सायंकाळच्या सुमारास पुन्हा कारसह घराला आग लावली. आगीत कारसह घरातील एसी जळून खाक झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. रघुनाथ नक्षणे याने दिलेल्या तक्रारीवरून मयूर उर्फ चिनी याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. जुन्या वादातून चिनी हा नेहमी वाद करीत असल्याचा आरोप रघुनाथ नक्षणे याने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवधुतवाडी पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...