आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव तालुक्यातील गुंज येथील प्रभु देव ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला मंगळवार, दि. १० मे रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, गुंज येथे प्रभु देव ट्रेडींग कंपनीचे भुसाराचा मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत तत्काळ गोडाऊन मालक रामराव धाडवे, सूबोध सूर्यकांत, प्रतापवार आणि शाम गंगाळे यांना माहिती दिली. तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठले असता, संपुर्ण गोडाऊन आगीत भस्मसात झाले होते. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग इतकी मोठी होती की, आगीने रौद्र रूप धारण केले होते.
दरम्यान पुसद व उमरखेड येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात केली. मात्र या गोडाउनमध्ये १ हजार ५०० क्विंटल हळद, १०० क्विंटल चणा, ८० क्विंटल तुर, ४० क्विंटल गहु, हळद ग्रेडिंग करण्याची मशिन या वस्तु मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच वाढली.
त्यामुळे जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. २४ तासानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविता आले. रात्रंदिवस जवानांकडून कुलींगचे काम सुरु होते. या आगीमध्ये संपुर्ण गोडाऊन जळून खाक झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.