आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या कंत्राटासाठी आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये पाच संस्थांनी आपल्या निविदा सादर केल्या असून यापैकी एकेका निवीदेसोबतच चक्क हजार-बाराशे कागदांचा ढीग जोडण्यात आला आहे. आता या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येते. त्यात घराघरातून कचरा संकलित करुन तो डंपिंग यार्ड पर्यंत पोहचवणे, नाली, नाले, रस्ते यांची स्वच्छता करणे यासह इतर स्वच्छतेच्या कामाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे या घनकचरा व्यवस्थापनाचा खर्चही वाढत चालला आहे.
त्यातच आता हा खर्च सुमारे १२ कोटी पेक्षा अधिक झाला आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने नवा कंत्राट काढला. त्यासाठी आतापर्यंत तीन वेळा निविदा प्रक्रीया राबवण्यात आली आहे. सुरूवातीच्या दोन वेळी एकही सक्षम संस्था उपलब्ध न झाल्याने पालिकेच्या वतीने तिसऱ्यांदा निविदा बोलावण्यात आल्या आहेत. यावेळी पाच संस्थांनी कंत्राटासाठी निविदा सादर केल्या आहेत.
या प्रत्येक निवीदेसोबत १ हजार ते १ हजार २०० इतक्या मोठ्या संख्येने कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाने आता सुरू केले आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर कंत्राट घेण्यासाठी सक्षम ठरणाऱ्या संस्थांच्या आर्थीक निविदा उघडण्यात येणार आहेत. मात्र मोठ्या संख्येने जोडण्यात आलेल्या या कागदपत्रांच्या तपासणीमुळे या प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी पालिकेचा हा १२ कोटींचा कचरा कंत्राट आता शहरवासीयांसाठी कुतूहलाचा विषय ठरत चालला आहे.
जुन्या कंत्राटदाराचे काम रेंगाळले सुमारे ६ महिन्यांपुर्वी जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपला आहे.तेव्हापासु न त्याला मुदतवाढ देवुन त्याच्याकडून स्वच्छतेची कामे करवुन घेण्यात येत आहे.मात्र दरवेळी देयके रखडल्याचे कारण पुढे करीत या कंत्राटदार संस्थेकडून स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसत आहे.त्यासंदर्भ ात पालिका मुख्याधिकाऱ्यांनी संबंधीत कंत्राटदाराला तंबी दिल्याचीही माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.