आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव एसटी बसची बोलेरोला धडक:एका मजुराचा जागीच मृत्यू; बारा मजूर जखमी,जखमींवर यवतमाळ, नागपूर रुग्णालयात उपचार

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव एसटी बसने मजुरांना घेवून जात असलेल्या बोलेरो वाहनाला दिलेल्या जबर धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला असून जवळपास बारा मजूर जखमी झाले आहे. ही धक्कादायक घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या शिवाजी नगर रेल्वे पटरी जवळ गुरूवार, दि. ३१ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जयसिंग जाधव असे मृत मजुराचे नाव आहे. तर श्रीराम पवार, आनंद आडे, धर्मराज आडे, असे गंभीर जखमीची नावे असून आकाश जाधव, पंकज पवार, दिनेश पवार, नारायण चव्हाण, युवराज राठोड, गुरुदास आडे आणि वामन पवार आदी जखमी आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अमरावती येथून यवतमाळकडे प्रवाशी घेवून येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएस-४०-एन-९१५३ ही यवतमाळकडे येत होती. तर बोलेरा वाहन क्रमांक एमएच-३६-एफ-२३५१ मजुरांना घेवून नेर तालुक्यातील सोनवाढोणा येथे जात होती. अश्यात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास लोहारा परिसरातील शिवाजी नगर रेल्वे पटरी जवळ दोन वाहनात समोरासमोर जबर धडक बसली.

या धडकेत जयसिंग जाधव या मजुराचा जागीच मृत्यू झाला तर जवळपास बारा प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जखमींना तातडीने यवतमाळ, नागपूर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी अविनाश आडे वय २३ वर्ष रा. सोनवाढोणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एसटी बसच्या वाहन चालकाविरोधात विविध गुन्हे नोंद केले आहे. पुढील तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...