आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मिक मृत्यूची नोंद:माहेरी आलेल्या विवाहितेची‎ गळफास घेऊन आत्महत्या‎

मोताळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरी आलेल्या एका तेवीस वर्षीय‎ विवाहितेने गळफास घेऊन‎ आत्महत्या केल्याची घटना‎ शनिवार, दि.८ एप्रिल रोजी सकाळी‎ ११ वाजेच्या सुमारास सारोळापिर‎ येथे उघडकीस आली. सविता‎ सोनाने असे मृत विवाहितेचे नाव‎ आहे. प्रकरणी फिर्यादीवरून‎ धामणगाव बढे पोलिसांत‎ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात‎ आली आहे.‎ तालुक्यातील सारोळापिर येथील‎ सुनिल वखरे यांनी धामणगाव बढे‎ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार‎ गावातीलच त्यांच्या चुलत बहिणीचे‎ मागील तीन वर्षांपूर्वी जळगाव‎ खान्देश जिल्ह्यातील बोदवड‎ तालुक्यातील येनगाव येथील संतोष‎ सोनाने यांच्यासोबत‎ रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते.‎

मागील काही दिवसांपूर्वी त्यांची‎ चुलत बहीण ही माहेरी आई‎ वडिलांना भेटीसाठी आली होती.‎ दरम्यान, दि.८ एप्रिल रोजी तिचे‎ आई, वडील शेताकडे गेले होते‎ यावेळी चुलत बहीण व तिचा मुलगा‎ घरी असतांना तिने अकरा वाजेच्या‎ सुमारास घरातील लोखंडी अँगलला‎ दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा‎ संपवल्याचे उघडकीस आले. अशी‎ फिर्याद सारोळापीर येथील सुनील‎ वखरे यांनी धामणगाव बढे‎ पोलिसांनी दिली असून यावरुन‎ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद‎ केली आहे. पुढील तपास पोनि‎ मोहनसिंग राजपूत हे करीत आहे.‎