आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित‎ समस्यांचे निवारण:आरोग्य कर्मचाऱ्यांच्या‎ समस्या निवारणासाठी‎ सीईओंकडे होणार बैठक‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित‎ समस्यांचे निवारण व्हावे, ह्या दृष्टीने‎ सोमवार, दि. १० एप्रिल रोजी मुख्य‎ कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बैठक‎ बोलावण्यात आली आहे. यासंदर्भात‎ राष्ट्र सेवा आरोग्य कर्मचारी‎ संघटनेच्या वतीने सीईओेंना निवेदन‎ देण्यात आले होते.‎ ‎ आरोग्य कर्मचाऱ्यांचे सातत्याने‎ उशिराने वेतन होते. यासंदर्भात‎ नियमितपणे संघटनेने पाठपुरावा केला‎ आहे.

आदिवासी भत्ता व एक स्तर‎ त्वरित लागू करून थकबाकी द्यावी,‎ टीमबेस इन्सेंटिव्ह, सीएचओंना‎ दिलेला अतिरिक्त प्रभाराचा इन्सेंटिव्ह‎ द्यावा, सीएचओ किंवा आरोग्यवर्धिनी‎ केंद्र नसलेल्या ठिकाणी कार्यरत‎ आरोग्य कर्मचाऱ्यांना पीबीआय द्यावा,‎ जिल्ह्यात २५ ठिकाणी सीएचओ‎ कार्यरत नाही. या ठिकाणचे पदे त्वरीत‎ भरावी, असे विविध मुद्दे घेऊन राष्ट्र‎ सेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष जय तिजारे यांच्यासह‎ पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी‎ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.‎