आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेने टाळले:शिक्षकदिनी 18 शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; संघटनेने दिले पुरस्कार

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो, परंतु गेल्या दोन वर्षापासून हा सोहळा आयोजित करण्यात आलेला नाही.यावर्षी सुद्धा हा मुहूर्त टाळला पण जे जिल्हा परिषदेला जमले नाही, ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मात्र करून दाखविले. दरवर्षी शिक्षकांच्या सन्मानाचा सोहळा आयोजित करण्याची परंपरा या संघटनेने या वर्षीही अबाधित राखत १८ शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सहकार भवनात हा सोहळा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे तसेच जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष धवसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रदीप मोहटे, विलास टोंगे, तुयार आत्राम, स्वप्नील फुलमाळी, शरद धारोड, नदिम पटेल, संजय बिहाडे व तेजस तिवारी आदि उपस्थित होते.

शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये माया सुदाम हलबले, सिता महेंद्र बन्सोड, सारीका ठाकरे, नितीन सावळे, रणधीर आडे, सुभाष भालेराव, सुनिता बदुकले, सोनल गुधाने, हिरामण टेकाम, राजेन्द्र खोब्रागडे, नेहा गोखरे, पंचफुला कनाके, राजेन्द्र गेडाम, शुभदा येवले, गुलाब सिसले व संतोष किनाके यांचा समावेश होता. या कार्यक्रमात सेवापुर्ती निमित्य मिलींद भगत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन संजय बिहाडे तर आभार शाम पहुरकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...