आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनासमोर आव्हान:कोरोनापाठोपाठ सायतखेड्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या दोन ते सव्वादोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. आता स्वाइन फ्लू (एन १, एच १) आजाराने ‘एन्ट्री’ मारली आहे. घाटंजी तालुक्यातील सायतखेडा येथे पहिला रुग्ण आढळला असून, प्रकृती बिघडल्याने रुग्णाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारांकरिता भरती करण्यात आले आहे. आता स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे कार्य आरोग्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे.

जिल्ह्यात सध्या वातावरणात अमुलाग्र बदल जाणवत आहे. परिणामी, सर्दी, खोकला, ताप आदींच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रूग्णांमुळे सरकारी तसेच खासगी रुग्णालय हाऊस फुल झाली आहे. कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण कोरोनाची तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. अधून मधून कोरोना पॉझिटीव्हचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता कमालीची वाढली आहे. असे असताना आता स्वाइन फ्लू आजाराची जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. घाटंजी तालुक्यातील सायतखेडा येथील ३५ वर्षीय युवक बाधित असल्याचे समोर आले आहे. त्या रुग्णाला काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला होता. ही लक्षणे कोरोनासारखी असल्याने प्रथमतः कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या.

मात्र, त्या निगेटिव्ह निघत होत्या. दरम्यान, त्यांचे एन १, एच १ च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रूग्णाचा रिपोर्ट एन १, एच १ पॉझिटिव्ह आले. प्रकृती बिघडल्याने त्या रुग्णाला नागपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारांकरिता दाखल केले आहे. तर त्यांच्या वडिलांचीसुद्धा प्रकृती बिघडली, परंतू त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या यवतमाळ येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत स्वाइन फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...