आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र कौतुक:रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला स्वत:च्या वाहनातून आणले रुग्णालयात; एसडीपीओ मिरखेलकर यांची खाकीतली माणुसकी

दिग्रस5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस दारव्हा मुख्य रस्त्यावर कामासाठी लावलेल्या बॅरीकेटमध्ये एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडुन असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना दिसले. मंगळवार दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यानच्या या घटनेत त्यांनी कोणत्याही वाहनांची वाट न बघता थेट सरकारी वाहनात जखमीला टाकून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले. आदीत्य मीरखेलकर यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे खाकीतील माणुसकीने एकाचे प्राण वाचविल्याचे बेलल्या जात असुन त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या सिमेंट रोड रस्त्याचे काम चालू आहे. परंतु मुख्य रस्ता पूर्ण होण्या अगोदरच हा रस्ता डागडुजीचे काम सुरू असल्यासाखरा झाला आहे. त्यात गावा जवळील पुलावर काम सुरू असल्याने तेथे ठेवलेले बॅरिकेटला कोणतेही रेडियम लावलेले नव्हते. त्यामुळे ऋषीकेश पवार रा. कारंजा लाड हे दारव्हा येथुन दिग्रस जात असतांना बॅरीकेट न दिसल्याने धडक लागून त्यांचा अपघात झाला. यावेळी कामासाठी या मार्गाने जाणाऱ्या उपविभआगीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना ही बाब लक्षात आली. त्यावर त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता सरकारी पोलीस वाहनात त्या जखमीला टाकुन दिग्रस येथील शासकीय रुग्णालयात रवाणा केले.

यावेळी पोलिस शिपाई प्रमोद इंगोले, सुनील चव्हाण तसेच दारव्हा येथील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ठाणे यांनी मदत केली. पुढील उपचारासाठी त्याचे नातेवाईकाला बोलावून यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. जर वेळीच त्सरलर उपचार आणि मदत मिळाली नसती तर कदाचित तो व्यक्ती उपचारापोटी दगावला असता. मात्र एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवलेले माणुसकीचे दर्शन सध्या महत्वाचे ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...