आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागला करंट:ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलेला लागला करंट

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला विजेचा धक्का बसल्याची घटना शुक्रवार, दि. २ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात आलेली रुग्ण घाबरून गेले होते. निशा आनंद इंगोले (३०) रा. विठ्ठल नगर, असे त्या महिलेचे नाव आहे.

दर शुक्रवारी येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांची तपासणी केली जाते. याच तपासणीसाठी म्हणून शहरातील विठ्ठलनगर येथील महिला निशा इंगोले ही आली होती. रांगेत लागलेल्या निशा इंगोले हीचा भिंतीला लागून असलेल्या अग्निशमनच्या लोखंडी पाइपला स्पर्श झाला. यावेळी विजेचा धक्का बसल्याने ती तेथेच खाली पडली. पुढील उपचारासाठी तिला रुग्णवाहिकेने यवतमाळ येथे हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...