आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांकडे केले होती अपील:त्या 52 शिक्षकांची एक वेतनवाढ थांबवली; आज होणार सुनावणी

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतर जिल्हा बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या ५२ शिक्षकांची एक वेतनवाढ थांबवण्यात आली होती. या शिक्षकांनी आयुक्तालयात धाव घेतली होती. दरम्यान, संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. या आदेशानुसार सोमवार, १२ सप्टेंबर रोजी शिक्षकांची सुनावणी होणार आहे, या सुनावणीनंतर अंतीम निर्णय आयुक्त घेतील.

दोन वर्षांनंतर यंदा शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली. ऑगस्ट महिन्यात लिंक सुरू झाली. तद्नंतर शिक्षकांनी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचीच नोंद अर्ज भरताना शिक्षकांनी कराव्या, अशा सुचना दिल्या होत्या. असे असताना बहुतांश शिक्षकांनी अर्ज भरताना चुकीची माहिती भरली. याबाबत मोठ्या प्रमाणात ओरड सुरू होती. शेवटी अर्ज दाखल केलेल्या संपूर्ण शिक्षकांची कागदपत्रांची तपासणी कररवी, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवली होती. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण शिक्षकांची कागदपत्रांची तपासणी केली असता, ५२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे समोर आले. अर्जात नोंद केलेले कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने त्या ५२ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे शिक्षकांनी आयुक्तांकडे धाव घेतली होती. या शिक्षकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सुनावणी घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात संबंधित शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. तद्नंतर विभागीय आयुक्त संबंधित शिक्षकांबाबत अंतीम निर्णय घेणार आहे.

अहवाल आयुक्तांकडे सादर करणार आंतर जिल्हा बदलीत चुकीची माहिती भरल्याच्या कारणाहून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. या शिक्षकांची आता सुनावणी होणार असून, सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. आंतर जिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांनासुद्धा आठवड्याभरात पदस्थापना देण्यात येणार आहे. - प्रमोद सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.

बातम्या आणखी आहेत...