आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद ते दिग्रस मार्गावरील पूस नदीच्या काठावर असलेल्या विठाला वार्ड येथे हेवी ट्रकने एका बँकेच्या कर्मचाऱ्याला चिरडले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने अपघाताची मालिका सुरू झाली असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येत आहे. संदीप कृष्णराव देशमुख (खंडार) (३८) रा. भाग्यनगर असे मृत बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे.
संदीप देशमुख हे अकोला येथील मुळचे रहिवाशी असून सुमारे दीड महिन्यापूर्वीच एचडीएफसी बँकेत त्यांची नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते पुसद येथील महिंद्रा फायनान्समध्ये काम करत असल्याने भाग्यनगरात घर भाड्याने घेऊन मुलगा, मुलगी व पत्नी राहत होते. त्यांना अकोला येथे नोकरी मिळाल्याने ते परिवारासह शिफ्टिंग करत होते. शुक्रवारी संदीप हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच-३०-एवाय-३६२१ ने अकोलावरून काम करून परिवाराला घेऊन जाण्यासाठी मानोरामार्गे पोहरादेवीकडून पुसद येथे येत होते.
यावेळी ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हेवी ट्रक क्रमांक एमएच ०५ डीके ९०७३ च्या चालक सुधीर राठोड याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवित दुचाकीला धडक दिली. त्यामुळे संदीप यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.
रस्त्यात अपघात झाल्याने काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पुसद ते दिग्रस महामार्गावरील रस्त्यावर नेहमी शेकडो वाहने ये-जा करतात. रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने वाहतुकीला ये-जा करतांना वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वीच वैष्णवी गोरे या २० वर्षीय तरुणीचा देखील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील घटना ह्या अतिक्रमणाला कारणीभूत ठरत असल्याच्या चर्चा आता सुरू झाले आहे. आणखी किती जणांचा बळी घेतल्यावर रस्त्यावरील अतिक्रमण हटेल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.