आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशा आशयाचे निवेदन आर्णी-केळापूर विधानसभेचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम तथा राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे राज्य प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती निमीष मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल काणारकर, यवतमाळ शहराध्यक्ष पंकज मुंदे, दादाराव राठोड, लालसिंग राठोड, सुरेश मेश्राम, नंदकिशोर पंडित, विजय तेलंगे, जावेद सैय्यद, आकाश येवले, पंकज राठोड, बंडू तोडसाम, रमेश धुर्वे, कृष्णा पेंडपवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेक्टरी ५० हजारांची मदत द्या,अजित पवारांकडे काँग्रेसची मागणी
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौरा कार्यक्रमानुसार नांदेडकडे जातांना येथील स्थानिक राजस्थानी भवन येथे थांबून काँग्रेसच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट सर्वे करून ५० हजारांची मदत करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसह निवेदन देण्यात आले.
उमरखेड, महागाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये दसुद्धा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला. त्याला परत उभारी देण्याकरिता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट सर्वे करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे इलेक्ट्रिक बिल माफ करणे या सर्व या प्रकारच्या मागण्या काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते यांच्याकडे मांडण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी आ. विजयराव खडसे, तातू देशमुख, दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल, रमेश चव्हाण, बाळू चंदरे, डॉ. कदम, खाज्याभाई, बाळू अण्णा, विवेक मुडे, सिद्धू जगताप, वीरेंद्र खंदारे, गजानन देशमुख, अमोल तुपेकर, किशोर ठाकूर, रुपेश भंडारी, गजानन भारती, यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घाटंजी तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले. तालुक्यात अनेक दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे शेतातील पिके उध्वस्त झालेली आहे.हातात आलेले पिक पूर्णपणे गेल्यामुळे शेतकरी वर्ग हा कमालीचा हैराण झालेला आहे. कापुस, सोयाबीन हे मुख्य पिक व संबंधीत पिके सर्व उध्वस्त झाले असताना घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने मदत त्वरित जाहीर करावी. शेतकऱ्यांना आधार म्हणून मागील कर्जमाफी पूर्णतः व्हावी.
शासनाचे धोरण शेतकऱ्यां विषयी मागील ७ मंडळ मधील ५ मंडळ यांना मदत मिळाली होती. परंतु घाटंजी तालुक्यातील परवा, कुर्ली हे सुटलेले मंडळ त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे व संपूर्ण तालुका हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव नितीन राठोड यांनी केली. यावेळी रा.वि. नगराळे, तुकाराम कोरवते, निखिल टिपले, महेंद्र आत्राम, नरेंद्र भगत, रा. वि. नगराळे, गौरव शेंडे, प्रदीप राठोड, हितेश जाधव, अनिल रामटेके, मधुकर घोडाम, चंद्रापाल ह. वेट्टी, अंकुश आडे, सिद्धांत जीवने, आदेश कुंटलवार, विनोद पवार, प्रकाश उगले, सादिक पठाण, संतोष गवळी, अनिल माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.