आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपुर्ण बंजारा समाजाची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांचा पंच धातुचा पुतळा स्थापन करण्यात येत आहे. यवतमाळ येथे तयार करण्यात आलेला हा पुतळा शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी पोहरादेवीकडे रवाना करण्यात आला. यानिमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत पोस्टल मैदान येथे सकाळी विधिवत पुजन करण्यात आले. यावेळी संत सेवालाल महाराजांच्या जयघोषात मोठी रॅली काढुन पुतळा पोहरादेवीकडे रवाना झाला.
संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे होणार आहे. त्यासाठी यवतमाळ येथे आकार घेतलेला हा पुतळा पोस्टल मैदान येथून पोहरादेवी कडे रवाना झाला. राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ, वाशिमचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते, रामधनजी महाराज गीमोना यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तांड्याचे नायक भाऊराव राठोड, एल. एच. पवार, वसराम राठोड, डॉ. टी. सी. राठोड, डॉ. विशाल राठोड, खाजगी सचिव डॉ. मोहन राठोड, डॉ. मुडे, डॉ. वर्षा चव्हाण, आशा राठोड, निशांत चव्हाण, डॉ. महेश चव्हाण, डॉ. वीरेंद्र राठोड, राजुदास जाधव, नवलकिशोर राठोड, प्रा. प्रेम राठोड, एन. टी. जाधव. हरीहर लिंगनवार, पराग पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान रॅलीला सेवा ध्वज दाखवण्यात आला. शिल्पकार रामू चव्हाण यांच्या हातून साकारलेला अश्वारूढ पुतळा पुतळ्याचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल ३ हजार १५८ दुचाकींवर पांढऱ्या रंगाचे ध्वज लावुन सहभागी झालेल्या समाज बांधवांची दुचाकी रॅली यावेळी काढण्यात आली. विशेष म्हणजे पोहरादेवी पर्यंत ही हजारो दुचाकींची रॅली पुतळ्याच्या सोबत होती.
भव्य असा हा पुतळा संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ ब्राँझ पुतळा अकरा फुट उंच आणि अकरा फुट लांब असुन तो दीड टन वजनाचा आहे. वर्षभरापासून कारागीर पुतळ्याचे काम करीत होते. ब्राँझ, जस्त, कथिल, लोखंड, सोने, चांदी या पंच धातूचा वापर पुतळा तयार करण्यात आला आहे. अतिशय रेखीव असा हा पुतळा आहे.
हे तर पांढरे वादळच.. शिल्पकार रामू चव्हाण यांच्या हातून साकारलेला हा पंच धातूचा अप्रतिम पुतळा अतिशय सुंदर व भव्यदिव्य असून हा पुतळा पोहरादेवी पर्यंत नेण्यासाठी आज युवकाच्या रूपाने उसळलेले हे पांढरे वादळ आहे. युवकांचा हा प्रचंड मोठा सहभाग पाहून मी भारावलो आहे. संजय राठोड. पालकमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.