आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक विकासासोबत विविध क्षेत्रात ग्राहक शोषणाची आव्हाने सुध्दा वाढत असल्याने ती थोपवण्यासाठी सशक्त ग्राहक चळवळीची आवश्यकता आहे. त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी सर्वच स्तरावर सक्षमपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन अ. भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सहसचिव जयंती कथेरिया यांनी केले.
येथील दीनदयाल प्रबोधिनीत आयोजित अ. भा. ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत तीन दिवसीय अभ्यासवर्गांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय संगठन मंत्री दिनकर सबनीस, विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, प्रांत सचिव नितीन काकडे, संघटक डॉ. अजय गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कथेरिया भाषणात पुढे म्हणाले, जसजसा आर्थिक विकास होत आहे तसतसे ग्राहक शोषणाचे मार्गही नवनवीन स्वरुप धारण करत आहे. आणि या सर्वातून मार्ग काढत ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी आपले कार्य पुढे न्यायचे आहे. शोषण मुक्त समाज, उचित व्यापार आणि खरेदीचे समाधान मिळणारा ग्राहक हेच ग्राहक पंचायतीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच ग्राहक पंचायत सदैव प्रयत्नरत आहे. संघटनात्मक बळ हा चळवळीचा आत्मा आहे.
उत्पादन मूल्य घोषीत करा या ग्राहक पंचायतीच्या परंपरागत मागणीचे महत्त्व आता सर्वांना लक्षात येवू लागले आहे. कारण किमतीच्या संदर्भातून होणारे घोळ विविध प्रकरणातून बाहेर येवू लागले आहेत. हे सर्व ग्राहक पंचायतीने केलेल्या जागृतीमुळे शक्य झाले आहे. अध्यक्षीय भाषणातून राष्ट्रीय संगठन मंत्री दिनकर सबनीस यांनी ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी सजग राहून ग्राहक शोषणमुक्तीसाठी सुरू असलेल्या या चळवळीत आपले प्रभावी योगदान कसे प्रभावी राहील याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यासाठी ग्राहक कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्याची आवश्यकता असल्याचेही जोरदार प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करुन स्वामी विवेकानंद अ.भा.ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बिंदुमाधव जोशी, विदर्भातील ग्राहक पंचायतचे उद्गाते वापू महाशब्दे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी प्रास्ताविक भाषणातून अभ्यास वर्गाच्या आयोजनामागची संकल्पना स्पष्ट केली. जिल्हा संघटक हितेश सेट, अनंत भिसे, ॲड. राजेश पोहरे, जिनेंद्र बंगाले, डॉ. केशव चेटुले यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रजनी सातोकर यांनी केले. तर प्रांत सचिव नितीन काकडे यांनी आभार मानले.
पूणे विद्युत ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष अॅड. अजय भोसरेकर, शासनाच्या विद्युत मंडळाच्या सल्लागार अॅड.गौरी चांद्रायण, ग्राहक राज प्रकाशनाचे दिलीप फडके, प्रांत सहसंघटक तृप्ती आकांत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भा प्रांतातून ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत अभ्यासवर्गात सहभागी झाले. प्रकाश चणेवार, शेखर बंड, श्रीराव, राधामल जाधवाणी, राजेंद्र कठाळे, अॅड. अनुपमा दाते, मतीन खान, डॉ. के. एस. वर्मा, तृप्ती गुघाणे ईत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.