आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांसह जिल्ह्यात येणाऱ्या पाल्यांच्या बालकांचे सर्वेक्षण आदर्श संचालन प्रक्रा (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) या माध्यमातून २० ते ५ डिसेंबर ह्या कालावधीत सर्वेक्षण होणार आहे. त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक आटोपली असून, सर्वेक्षणाच्या दृष्टीने आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत.
दरवर्षी जिल्ह्यातून शेकडो नागरीक कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात जातात. त्यांच्यासोबत त्यांचे पाल्य सुद्धा जात आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडत आहे. तर जिल्ह्यात येणाऱ्यांची सुद्धा अशाच पद्धतीने अवस्था आहे. या बालकांना प्राथमिक शिक्षण मिळावे, ह्या दृष्टीने शासनाने सर्व शिक्षाच्या वतीने ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. आदर्श संचालन प्रक्रा (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) या माध्यमातून २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर हया १५ दिवसांच्या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे. यात प्रामुख्याने विट्टभट्या, इमारत बांधकाम, ऊसतोड कामगार, हॉटेल, यासइ इतरही ठिकाणी काम करणाऱ्या तसेच हजर असलेल्या बालकांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे.
अन्यथा शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे. शिक्षण हमी कार्डाच्या माध्यमातून बालकांना वयोगटानुसार शाळेत प्रवेश दिल्या जाणार आहे. हे सर्वेक्षण जिल्हाभरात घरोघरी केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या दृष्टीने गट शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. सर्वेक्षणात आढळून येणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश शासनाचा आहे.
जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर समिती
सर्वेक्षण कटिबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्याकरता जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर समितीचे गठण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पर्यवेक्षक म्हणून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक काम सांभाळणार आहे. यात अंगणवाडी सेविका, मुदनिससुद्धा मदत करणार आहे. विशेष म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक प्रगणक म्हणून काम पाहणार आहेत.
शाळाबाह्य विद्यार्थ्याचे समरूप सर्वेक्षण
दरवर्षी जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणानंतर आढळून येणाऱ्या बालकांना नजीकच्या शाळेत वयोगटानुसार प्रवेश देण्यात येते. यंदा मात्र, शाळाबाह्य सर्वेक्षण आटोपले असून, थोड्याफार प्रमाणात आदर्श संचालन प्रक्रियेच्या माध्यमातून बालकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाला शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.