आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:आयुक्तांचे पथक करणार मनपूर, रूई गावांची पाहणी ; संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुरस्कार प्राप्त तालुक्यातील मनपूर, दिग्रस तालुक्यातील रूई तलाव गावांची तपासणी करण्याकरता मंगळवार, दि. ७ जून रोजी आयुक्तांचे पथक येणार आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते. मात्र, कोविडच्या संसर्गामुळे २०२०-२१ मधील स्पर्धा होवू शकली नाही. तरीसुद्धा जिल्हास्तरीय पुरस्काराकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत यवतमाळ तालुक्यातील मनपूर गावाने प्रथम, तर दिग्रस तालुक्यातील रूई तलाव गावाला दुसरा पुरस्कार मिळाला होता. दोन्ही गावाची विभाग स्तरावर निवड झाली होती, परंतु कोविडच्या संसर्गामुळे विभागीय आयुक्तांच्या पथकाने प्रत्यक्ष गावात येवून तपासणी केलीच नव्हती. आता आयुक्तांची तपासणी होणार असून, मंगळवारी, ७ जून रोजी आयुक्तांचे पथक जिल्ह्यात येणार आहे. पहिल्यांदा मनपूर नंतर रूई तलाव गावाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. पाहणीनंतर गावांना गुणांकन देण्यात येणार असून, सर्वांधिक गुणांकन मिळणाऱ्या गावांची निवड विभागस्तराहून राज्यस्तरावर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...