आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन‎:समर्थ स्कूलमध्ये रंगले तीन दिवसीय‎ समर्थोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन‎

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील समर्थ प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमधील तीन दिवसीय समर्थोत्सव जल्लोष या कार्यक्रमाचे उद‌्घाटन गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, संस्थेचे चेअरमन शशिकांत महाजन, संचालिका मीना महाजन, मुख्याध्यापक सी. एस. शर्मा, सैनिक श्रीराम महाजन, डॉ. अशोक ओस्तवाल, कवि अहिरे, आर्यन इन्फोटेकच्या संचालिका लीना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. समर्थोत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात धावणे, लिंबू चमचा, फुगे अशा विविध खेळांचा समावेश हाेता. दुसऱ्या दिवशी फूड अॅण्ड फन फेअर हा बालगोपाळांचा मेळावा पार पडला. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी जल्लाेष व उत्साहात नृत्य, गायन, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास पालकांची माेठी उपस्थिती होती. सूत्रसंचालन राकेश पाटील, माधुरी महाजन, जयश्री खैरनार यांनी तर प्रा. किरण गढरी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...