आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:वाघाचा शिवणाळा येथे‎ गोठ्यातील गायीवर हल्ला‎

मारेगांव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोटोणी जंगलात वाघाचा मुक्त संचार असून‎ दि. ३ मार्चला रात्री शिवणाळा येथील शेतकरी कांहू लेतू‎ आत्राम यांची शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर‎ वाघाने हल्ला करून ठार केले. शनिवारला शेतकरी शेतात‎ गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात‎ भीतीचे वातावरण असून जनतेने सावध राहावे असा‎ इशारा वन विभागाने दिला आहे.‎

बोटोनी परिसरातील मारेगाव झरी तालुक्याच्या हद्दीत‎ वन विभागाचे हजारो हेक्टरचे वनक्षेत्र आहे. या वन‎ क्षेत्राला लागूनच राष्ट्रीय टीपेश्र्वर अभयारण्य येते. हा‎ ठिकाणी असलेले वाघ अन्नाच्या शोधात तालुक्यातील‎ वनक्षेत्रात प्रवेश करतात. यापूर्वी सुध्दा अनेकदा या भागात‎ वाघाने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहे.‎

बातम्या आणखी आहेत...