आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात वाढला गारवा:पुसदमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार, तर महागावात वीज पडून तरुण ठार; अनेक ठिकाणी घरांची झाली पडझड

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री केली. अशात शनिवार, दि. ११ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. महागाव तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी) येथे शनिवार, ११ जून रोजी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यात एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यु झालां. पृथ्वीराज काजूलाल राठोड वय १८ रा. सुधाकरनगर (पेढी), असे मृतकाचे नाव आहे. पुसद परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बहुतांश घरांची पडझड झाली असून, झाडे, वीज खांब उन्मळून कोसळली. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. दिवसभर उन्हाची तिव्रता कमी झाल्याचे दिसून आले. ढगाळी वातावरणामुळे गारवा वाढला होता.

यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. या अंदाजानुसार मान्सूनने आगेकूच सुद्धा केली होती, परंतू मागिल काही दिवसांपासून मान्सूनने महाराष्ट्राच्या वेशीवर मुक्काम ठोकला होता. अशात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. राज्यातील मुंबई सहज तळ कोकणात मान्सूनच्या सरी कोसळल्या, परंतु विदर्भात मान्सून दाखल होण्याकरिता आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा
मृगनक्षत्र लागून आता पाच दिवसांचा कालावधी लोटल्या गेला. मात्र, अद्यापही मान्सूनचे आगमन झालेच नाही. अशात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. सोमवार, दि. १३ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी
मान्सूनच्या सरी कोसळल्यानंतर पेरण्यांना सुरूवात करणे अपेक्षीत आहे. मात्र, बऱ्याचवेळा पावसाच्या सरी कोसळण्यापूर्वीच शेतकरी पेरण्या आटोपून घेतात. पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरण्या करण्याची पाळी येते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...