आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई‎:बेलोऱ्यात विनापरवाना वाळूची अवैध‎ वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला‎

पुसद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलोरा येथून शनिवार, ४‎ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या‎ दरम्यान अवैधरीत्या विनाक्रमांकाच्या‎ ट्रॅक्टरमध्ये रेतीची तस्करी सुरू होती.‎ याची माहिती खंडाळा पोलिसांना‎ मिळाली. त्या माहितीच्या आधारे‎ पेट्रोलिंग दरम्यान विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर‎ अडवून कारवाई करण्यात आली. या‎ प्रकरणी पोलिस कर्मचारी नासिर शेख‎ यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर‎ चालकाविरोधात खंडाळा पोलिस‎ स्टेशनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास‎ विविध कलमान्वये गुन्हे दाखल‎ करण्यात आले आहे.‎

खंडाळा पोलिस स्टेशनच्या‎ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार‎ बेलोरा येथून विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर‎ ट्रॉली मधून पाच हजार रुपये किंमतीची‎ एक ब्रास रेतीची अवैधरीत्या वाहतूक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करत असल्याची माहिती खंडाळा‎ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस‎ निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, सुभाष‎ हगवणे, नासीर शेख यांना मिळाली‎ होती. त्या माहितीच्या आधारे पेट्रोलिंग‎ दरम्यान सापळा रचून ट्रॅक्टर चालकाला‎ पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ‎ काढला. दरम्यान, खंडाळा पोलिसांनी‎ सात लाख रुपये किंमतीची ट्रॅक्टर‎ ट्रॉली, पाच हजार रुपये किंमतीची‎ एक ब्रास रेती, असा एकूण सात‎ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल‎ जप्त केला आहे.‎

शेंबाळपिंपरीत देशी दारू‎ विकणाऱ्यांवर कारवाई‎ तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे मोठ्या‎ प्रमाणात अवैधरीत्या देशी दारू विक्री‎ होत असल्याची माहिती पोलिसांना‎ शुक्रवारी मिळाली.त्या माहितीच्या‎ आधारे खंडाळा पोलिसांनी पाच‎ ठिकाणी अवैधरीत्या देशी‎ दारू,प्रतिबंधक गुटखा व पान‎ मसाल्याच्या पान टपरीवर धाडी‎ टाकल्या.या धाडीत

शेंबाळपिंपरीत देशी दारू‎ विकणाऱ्यांवर कारवाई‎ तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे मोठ्या‎ प्रमाणात अवैधरीत्या देशी दारू विक्री‎ होत असल्याची माहिती पोलिसांना‎ शुक्रवारी मिळाली.त्या माहितीच्या‎ आधारे खंडाळा पोलिसांनी पाच‎ ठिकाणी अवैधरीत्या देशी‎ दारू,प्रतिबंधक गुटखा व पान‎ मसाल्याच्या पान टपरीवर धाडी‎ टाकल्या.या धाडीत जवळपास आठ‎ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.‎

बातम्या आणखी आहेत...