आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:94  वर्षांपासून जोपासली शारीरिक व्यायामाची परंपरा; मुला, मुलींना लाठीकाठीचे प्रशिक्षण

अमोल शिंदे | यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सन १९२८ मध्ये वणी येथे स्थापना झालेल्या श्री. नृसिंह व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाने शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण देण्याचे महत्त कार्य पार पडले आहे. तब्बल ९४ वर्षांपासून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी ही परंपरा अबाधीत ठेवली आहे. विदर्भस्तरीय कुस्ती, पुरूष, महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे वणी शहरातील गुद्दल पेंडी स्पर्धा मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते.

वणी शहरातील यात्रा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सन १९२८ मध्ये श्री. नृसिंह व्यायाम शाळा गणेश उत्सव मंडळाची स्थापना झाली होती. त्या कालावधीत मंडळाचे बालाजी चित्तल, विठ्ठलराव कोंडावार, वासूदेव कोंडावार, दुर्लेभदास भाटे, लाभचंद्र काठेड, आप्पाजी देकुलवार, जग्गु आकेवार, आदींनी टप्प्या-टप्प्याने मंडळाचे पद सांभाळले आहे. स्थापनेपासूनच मंडळाने व्यायाम, मैदानी खेळ, कवायतीवर भर दिला आहे. रंगपंचमीच्या मुहूर्तावर खेळण्यात येणारा गुद्दल पेंडी खेळसुद्धा श्री. नृसिंह व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाने चालू केला होता. आजही हा खेळ नित्यनियमाने दरवर्षी खेळल्या जातो. मुला, मुलींना शारीरिक व्यायाम, लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येते. सध्या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, उपाध्यक्ष बाबू लाल पोटदुखे, अनिल मुजगेवार, सचिव पुरूषोत्तम आकेवार, रमेश उगले, पांडूरंग ताटेवार, दत्ताजी मुजगेवार, शेख शब्बीर शेख बापूमिया, दिलीप येमुलवार, दादाराव राऊत, अब्दूल गनी, अब्दूल अजीज, दशरथ बावणे, नागोराव नलभिमदार, बाबाराव नांदेकर, पुरूषोत्तम ठेंगणे, रमेश शर्मा, सुनिल आक्केवार, मुन्नालाल पवार, सुनील मुजगेदार, बंडू खिरेकार, मोहमद जफर मो. गनी आदी सदस्य आहेत.

मंडळाच्या वतीने आज रक्त तपासणी शिबिर
श्री. नृसिंह व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाने यंदा रक्त तपासणी शिबिर घेण्याचे ठरविले आहे. बुधवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...