आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज लंपास:भाजीपाला एजंटचे घर फोडले, 27 लाखांचा ऐवज लंपास

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने भाजीपाला कमिशन एजंटच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा एकूण २७ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवार, ११ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पन्ना उर्फ हिरालाल जयस्वाल रा. रेणुका मंगल कार्यालयाजवळ, अरुणोदय सोसायटी, यवतमाळ यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शहरातील रेणुका मंगल कार्यालय परिसरातील अरुणोदय सोसायटीतील पन्ना उर्फ हिरालाल जयस्वाल शुक्रवारी काही कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चाेरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील २० लाखांचे सोने आणि ७ लाखांची रोख असा एकूण २७ लाखांचा ऐवज लंपास केला. ही बाब शनिवारी रात्री कुटुंबीय बाहेरगावावरून परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यांनी अवधूतवाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. रविवारी सकाळी अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अरुणोदय सोसायटी गाठून पाहणी केली.

या प्रकरणी पन्ना उर्फ हिरालाल जयस्वाल यांच्या तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी पन्ना उर्फ हिरालाल जयस्वाल यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, त्यात दोन चोरटे कैद झाले असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...