आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोग:एक एकर मिरचीतून वर्षभरात कमावले तब्बल 6 लाख रुपये; शेतकर्यांच्या प्रयत्नांना यश

वनोजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने पश्चिम विदर्भातील शेती तोट्यात जाऊन शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र वाशीम जिल्ह्यातील शेलुबाजार येथील योगेश रवी सावके यांनी कृषीचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून वेळ वाया न घालता थेट आपल्याच एक एकर शेतात हिरव्या मिरचीची लागवड केली.

त्यांना मिरची पिकातून आजपर्यंत तब्बल ६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. यातून त्यांनी शेती व्यवसाय कसा फायद्याचा आहे, हे सिद्ध करून दाखवले. पश्चिम विदर्भातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने तेथील शेती पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतीचे मोठे नुकसान होते. शेती तोट्यात जात असल्याने येथील तरुण नोकरीसाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जातात. मात्र, योगेश सावके यांनी आपल्याप्रमाणेच इतर तरुणांनी शेतीकडे वळावे, यासाठी तरुण शेतकऱ्यांची मोट बांधणे सुरू केले आहे. शेलुबाजार परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ते आपल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यांच्या विक्रमी उत्पन्नामुळे परिसरातील शेतकरी यांच्याकडे वेगवेगळ्या पिकासंबंधी मार्गदर्शन घेण्याकरता येत असतात.

कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यामध्ये योगेश यांचा जम बसलेला आहे. रासायनिक औषधींचा कमी वापर करून नैसर्गिकरित्या कसे उत्पन्न वाढेल, याच्यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यांना या वर्षी एक एकर शेतीत पिकवलेल्या मिरचीपासून तब्बल ६ लाख रुपये नफा मिळाला आहे. हा प्रयोग वाढवून परिसरातील शेती हायटेक करनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...