आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:न्यायालयाच्या परिसरात सुनावणीसाठी आलेल्या एकावर महिलेचा कटरने हल्ला

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचार केल्याच्या घटनेसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीसाठी आलेल्या एका व्यक्तीवर पीडित महिलेने धारदार कटरने हल्ला करुन त्याला जखमी केले. थेट न्यायालय परिसरात बुधवार दि. १४ रोजी भर दुपारी १ वाजता घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र उपस्थित पोलिसांनी लगेच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

विशाल शेंडे, वय ४० वर्षे रा. शिंदे नगर असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात विशाल शेंडे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संबंधीत महिलेने विशाल याच्याविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून विशाल विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल असुन त्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीसाठी विशाल हा बुधवार दि. १४ रोजी न्यायालयात आला होता. यावेळी पीडित महिलेचा पती त्या ठिकाणी उपस्थित होता. थोड्या वेळाने पीडित महिला त्या ठिकाणी आली. यावेळी तीच्या पतीने इशारा करताच त्या महिलेने सोबत आनलेल्या कटरने माझ्या चेहऱ्यावर हल्ला केला. ही बाब लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्या दोघांना बाजुला केले असे तक्रारीत नमुद आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सर्वांना ताब्यात घेवुन शहर पोलिस ठाण्यात आनले. जखमी विशाल शेंडे याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिला आणि तीचा पती या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

न्यायालय परिसरात एका महिलेने एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती अवघ्या काही वेळात संपुर्ण शहरात पसरली होती. त्यामुळे शहरात विविध चर्चेला पेव फुटले होते. अत्याचार केल्याचा राग मनात धरुन पीडित महिलेने त्या व्यक्तीवर हल्ला केल्याचीही चर्चा सुरू होती. आता या हल्ल्यामागील नेमके कारण या प्रकरणात पुढे येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...