आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लांबवले:बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने लांबवले

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या एका प्रवाशी महिलेच्या पर्समधील दोन लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना जुने बसस्थानक परिसरात मंगळवार, २९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शीतल पांचाळ वय ३७ वर्ष रा. दर्यापूर जि. अमरावती यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शहरातील नविन बसस्थानक परिसरात महिला चोरट्यांच्या टोळीने हैदोस घालून अनेक प्रवाशी महिला, पुरुषांना टार्गेट करीत सोन्याचे दागीने, रोख रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला होता. या प्रकरणी अनेक गुन्हेही अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या महिला चोरट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी बसस्थानक परिसरात पोलिस तैनात करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

याबाबतचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेताच दुसऱ्याच दिवशी दोन पोलिस कर्मचारी बसस्थानक परिसरात तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता बसस्थानक परिसरातून त्या महिलांच्या टोळीने पळ काढला असून आता जुने बसस्थानक परिसर या टोळीकडून टार्गेट करण्यात येत आहे. अश्याच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील महिला प्रवाशी यवतमाळ येथे काही कामानिमीत्त आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...