आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूग्गणालय:झरी तालुक्यातील सावळी येथील महिलेचा नागपुरात स्वाइन फ्लूने मृत्यू

यतवमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकृती बिघडल्याने झरी जामणी तालुक्यातील सावळी येथील ६० वर्षीय महिलेला नागपूर येथे उपचारांकरिता भरती केले होते. या महिलेचा रविवारी मृत्यू झाला. महिलेची नागपूर येथील रूग्गणालयात केलेल्या तपासणीत स्वाइन फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. जिल्ह्यातील एकूण ६ जण स्वाइन फ्लू बाधित झाले आहेत. मात्र, यातील चार रुग्ण बाहेर जिल्ह्यात वास्तव्यास असून, एक, घाटंजी आणि दुसरी झरी येथील मृत महिला आहे.

दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. आता कोरोनासारखेच लक्षणे असलेल्या स्वाइन फ्लू आजाराने काही जिल्ह्यात एन्ट्री केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही एक स्वाइन फ्लू बाधित रुग्ण आढळून आला आहे. घाटंजी तालुक्यातील सायतखेडा येथील ३५ वर्षीय युवकाचा स्वाइन फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या रुग्णाला उपचारांकरिता नागपूर येथे भरती केले आहे. अशात झरी तालुक्यातील सावळी येथील ६० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडली होती. त्या महिलेला सुरूवातीला उपचारांकरिता शनिवारी वणी येथील रुग्णालयात दाखल केले होते, परंतू प्रकृती बिघडल्याने नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली होती. तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यातील सध्या ६ जण स्वाइन फ्लू ने बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली, परंतू ह्यातील चार रुग्ण बाहेर जिल्ह्यात वास्तव्य करणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...