आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका घरात प्रवेश करीत रूममध्ये लटकून असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. ही घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या सप्तशृंगी नगरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. प्रणाली प्रांजळे वय २४ वर्ष रा. सप्तशृंगी नगर असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी काजल चौधरी रा. सप्तशृंगी नगर यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, काजल चौधरी या महिलेकडे शुक्रवारी सकाळच्या सुमारास परिसरातील प्रणाली प्रांजळे ही महिला आली होती. त्यानंतर काही वेळाने चौधरी याच्या घरातील रूममध्ये लटकून असलेल्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी आणि कानातले आदी ३२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. तो मुद्देमाल प्रणाली प्रांजळे हिने लंपास केल्याचा संशय काजल चौधरी यांनी व्यक्त करीत या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून संशयित महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली. दरम्यान तीने दागिने लंपास केल्याची कबूली पोलिसांना दिली असून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंबोरे पोलिस ठाण्यातील मारोती केराम, रूपाली, राऊत, अजय देशमुख यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.