आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:रागाच्या भरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पुसद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील रोहडा येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. रागाच्या भरात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समोर आली आहे. असे असले तरी आत्महत्येची नेमके कारण मात्र करू शकले नाही. एकुलता एक लेकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कार्तिक विजय वारकड वय २२ वर्ष रा. रोहडा असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे.

कार्तिक याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. घटनेच्या दिवशी कार्तिकचे आई वडील दि. १० नोव्हेंबरला नेहमी प्रमाणे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. कार्तिक हा घरात एकटाच असताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची माहिती कार्तिकच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर खंडाळा पोलिसांना कार्तिक याच्या काकांनी माहिती दिली. माहिती मिळताच खंडाळा पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून याबाबतचा पुढील तपास खंडाळा पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...