आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:इसापूर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील तरुणाने राहत्या घरात आड्याला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली.मिथुन श्रीराम खंडारे (२७) रा. इसापूर याने राहत्या घराच्या आड्याला साडी बांधून गळफास घेतला. याबाबत दिग्रस पोलिसांना माहिती दिली.

त्यावरून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाने गळफास का घेतला हे अजून कळू शकले नाही. मृताच्या पश्चात आई, भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे. दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास उपनिरीक्षक विनाश जाधव व रमेश जाधव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...