आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंदी-भोसरी मार्गावर अपघात:पुणे येथे दुभाजकाला दुचाकी‎ धडकून पातुर्ड्याच्या तरूणाचा मृत्यू‎

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर‎ तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील ‎रहिवासी आशिष पुरणलाल‎ केळकर वय ३३ हा युवक मित्रासह ‎कंपनीचे काम संपल्याने दुचाकीने ‎ ‎ आळंदी भोसरी रस्त्याने जाताना ‎रस्त्यालगत दुभाजकावर दुचाकी ‎आदळून झालेल्या अपघातात‎ त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर‎ दुचाकीच्या मागे बसलेला‎ आशिषचा मित्र हा गंभीर जखमी‎ झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी‎ रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास‎ आळंदी भोसरी रस्त्यावरील साई‎ मंदिरा जवळ घडली‎ तालुक्यातील पातुर्डा येथील ३३‎ वर्षीय युवक आशिष केळकर हा‎ पुण्यात एका‎ कंपनीत नोकरी‎ करीत होता‎ कंपनीचे काम‎ आटोपून तो‎ दुचाकीने‎ मित्रासह आळंदी भोसरी रस्त्याने‎ घराकडे जात होता. साई मंदिरा‎ जवळ येताच त्यांची दुचाकी‎ रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाला‎ जाऊन भिडली.

या अपघातात‎ आशिषचा जागीच मृत्यू झाला. तर‎ दुचाकीच्या मागे बसलेला मित्र‎ गंभीर जखमी झाला आहे. या‎ घटनेची माहिती त्याच्या कुटुंबाला‎ समजताच त्यांनी घटनास्थळी‎ घेतली. गंभीर अवस्थेत आशिष व‎ त्याचा मित्र दोघांना दवाखान्यात‎ हलविले. परंतु तपासणी करून‎ डॉक्टरांनी आशीषला मृत घोषीत‎ केले. तर गंभीर जखमी असलेल्या‎ मित्रावर पुण्यातील एका खासगी‎ रुग्णालयात उपचार सुरु असल्याची‎ माहिती आहे. त्याच्यावर पातुर्डा येथे‎ शोकाकूल वातावरणात‎ अंत्यसंस्कार करण्यात आले.‎ त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी,‎ दोन मुले, तीन भाऊ आप्त परिवार‎ आहे. आशिष हा घरातील कर्ता व‎ मनमिळाऊ मुलगा होता.‎

बातम्या आणखी आहेत...