आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुसदची घटना:अंगणात झोपलेल्या काका, मामाची तरुणाने केली कुऱ्हाडीने हत्या; माथेफिरूचा आई-बहिणीसह तिघांवर हल्ला

पुसद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणाने गाढ झोपेत असलेल्या काकांसह मामावर कुऱ्हाडीने वार करत ठार केले.

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने गाढ झोपेत असलेल्या काकांसह मामावर कुऱ्हाडीने वार करत ठार केले. त्यानंतर त्याने एवढ्यावरच न थांबता अंगणात झोपलेल्या एका शेजारी महिलेसह त्याच्या घरात झोपलेल्या आई, बहीण व काकावरही प्राणघातक हल्ला केला. यात चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही खळबळजनक घटना पुसद तालुक्यातील कारला देव येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. या प्रकरणी त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ विलास राठोड (२३, रा. कारला) असे माथेफिरूचे नाव आहे. वसंता जेठा राठोड (६० ) आणि मेरचंद शामा आडे (७०) अशी मृतांची नावे आहेत. गोकुळ राठोड या तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्याची चर्चा गावात सुरू होती. १८ एप्रिलला रात्री कुटुंबीयांतील सर्वांनी जेवण केले. त्यानंतर महिला घरात, तर पुरुष बाहेर अंगणात बाज टाकून झोपले होते.

दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास गोकुळ राठोड हा घरात ठेवलेली कुऱ्हाड घेऊन घराबाहेर आला व अंगणात झोपलेले त्याचे काका वसंता राठोड यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांच्याच बाजूला झोपलेला मामा मेरचंद आडे यांनाही जागीच ठार केले. घरात झोपलेली आई सुनीता आणि बहीण अश्विनी यांच्यावरही कुऱ्हाडीने सपासप वार केले. या वेळी आई आणि बहीण जागी झाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर गोकुळ आरडाओरड करत घराबाहेर आला आणि बाहेर झोपलेल्या शेजारी यशोदा जाधव यांच्यावर वार करून जखमी केले.

दुसऱ्या काकावरही केला हल्ला
त्यानंतर गोकुळने बाहेर झोपलेल्या दुसऱ्या एका काकावर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हात आडवा केल्याने कुऱ्हाडीचा घाव हातावर बसला. अारडाअाेरड झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व गोकुळला पकडून गाेठ्यात बांधून ठेवले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गोकुळ याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.


बातम्या आणखी आहेत...