आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनामी केल्याच्या वादातून पुसद शहरात घडली घटना:मध्यरात्री घरात घुसून युवकावर चाकूने हल्ला; गुन्हा दाखल

​​​​​​​पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनामी केल्याने घरात घुसून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या हद्दीत २९ ऑगस्टला मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली. भाविक (३१) रा. असे जखमीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर राजू आघव (३०) रा. सावळी जि. हिंगोली याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भाविकचे लग्न झाले होते. भाविकला एक मुलगीही आहे. त्याची पत्नी १७ एप्रिलला कोणालाही न सांगता मुलीला घेऊन निघून गेली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर २७ जूनला राहत्या घरी परत आली.

त्यांचा संसार व्यवस्थित सुरू असताना २७ ऑगस्टला सकाळी ११ च्या दरम्यान भाविकला राजूने फोन केला. फोनमध्ये बदनामी का करत आहे असे म्हणत वाद केला. नंतर भाविकने राजूला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजूने ऐकले नाही. घटनेच्या दिवशी २८ ऑगस्टला रात्री १२ च्या सुमारास भाविक व त्याचे कुटुंब नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. मध्यरात्रीनंतर २९ ऑगस्टला २.३० च्या सुमारास राजू हा भाविकच्या घरात घुसला व छातीवर बसून मारहाण केली. भाविकने आरडाओरडा केली असता राजूने त्याचे हातातील चाकूने गळ्यावर घाव घातला. आरडाओरडा ऐकून भाविकचे आई, वडील व पत्नी झोपेतून उठले व घरातील सर्व लाईट लावून पाहिले असता राजू घाबरला व बाहेर पळून गेला. कुटुंबीयांनी त्याला उपचारांकरिता प्रथम सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तेथे डॉक्टर नसल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखम बरी झाल्यावर वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

बातम्या आणखी आहेत...